
लोकशाही दिन सोमवारी
रत्नागिरी:- जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. माहे ऑगस्ट 2023 चा लोकशाही दिन सोमवार 7 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 1 ते 2 या वेळेत होणार आहे.
लोकशाही दिनाकरिता नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने नागरिकांचे समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करू शकतात, असे सामान्य प्रशासनाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.