
दिल्लीतील संस्थेतर्फे डॉ. तानाजीराव चोरगे सन्मानित
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांना दिल्लीतील नामवंत संस्थेचा बेस्ट चेअरमन परफॉरमन्स् अवार्ड २०२२ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
इंटेलिक्चुअल पीपल्स् फाउंडेशन ही संस्था दिल्ली येथे कार्यरत आहे. ही संस्था भारताची अर्थव्यवस्था, देवाण-घेवाण, कल्याणकारी योजनांच्या माहितींचे संकलन करून, आरोग्य, शिक्षण, वाणिज्य आणि उद्योग, सामाजिक सेवा, बँकिंग सेवा आणि इतर क्षेत्रांतील व्यक्ती, संस्था आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे योगदान आणि कामगिरीबद्दल पुरस्कार दिला जातो. या संस्थेने बँकेचे अध्यक्ष कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांना दिल्लीत पद्मश्री डॉ. जितेंद्र सिंग शंटी यांच्या हस्ते ”बेस्ट चेअरमन परफॉरमन्स अवार्ड २०२२” पुरस्कार प्रदान केला. हा सोहळा दिल्लीत उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत, खासदार अब्दुल खालीद, राजदूत डॉ. बी. व्ही. सोनी, ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे आसामचे जॉइंट सेक्रेटरी हरिपाल रावत यांच्या उपस्थितीत पार पडला.