
कोळंबे प्रशालेत लो.टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती साजरी
संगमेश्वर:- तालुक्यातील श्रीमती क. पां. मुळये हायस्कूल व क.महाविदयालय कोळंबे ता.संगमेश्वर या विदयालयामध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमानिमित्त तीन गटात वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. प्राथमिक गट प्रथम क्रमांक सृष्टी खडसडे हिने पटकावला,तर द्वितीय क्रमांक श्रेया मोरे तर तृतीय क्रमांक अर्णव पडवळ याने पटकावला.
माध्यमिक गटामध्ये प्रथम क्रमांक शुक्रा मोहिते हिचा आला.तर द्वितीय क्रमांक तिर्था वेल्ये हिने पटकावला. तर तृतीय क्रमांक स्विटी चंदरकर हिचा आला.
उच्च माध्यमिक गटामध्ये प्रथम क्रमांक भूमिका चंदरकर हिने प्राप्त केला. द्वितीय क्रमांक स्वराज कानर याने पटकावला तर तर तृतीय क्रमांकाची मानकरी दिशा मोहिते ठरली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. आर व्ही मुळये, प्रमुख पाहुणे श्री. जुवेकर सर होते.
श्रीमती मुळये मॅडम यांनी लोकमान्य टिळक तर श्री. कोळपे सर यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर माहिती सांगितली.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून सौ. रानभरे, श्री. करडे श्री. रहाटे यानी काम पाहिले. सूत्रसंचालन श्री.शिंदे, फोटाग्राफी श्री.बहिरम सर यांनी केली आणि शेवटी आभार सौ. फराकटे यांनी मानले.