
रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर
रत्नागिरी… रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाच्या सन 2023 ते सन 2026 ही त्रैवार्षिक कार्यकारिणी सदस्य निवडणूक पार पडली, संघाच्या इतिहासात प्रथमच निवडणुकीने सदस्यांची निवड करण्यात आली.
या निवडणुकीत दोन पॅनल समोरासमोर उभे होते, विद्यमान कार्यकारिणी सदस्यांचे एक पॅनल आणि राजीव कीर यांचे श्रीमान भागोजीशेठ कीर भंडारी समाज पॅनल या दोन पॅनल मध्ये निवडणूक झाली,,मात्र सदस्यांनी विद्यमान कार्यकारिणी ला स्वीकारले नाही आणि राजीव कीर यांच्या नेतृत्वाखाली श्रीमान भागोजीशेठ कीर भंडारी समाज पॅनल चे सर्वच्या सर्व सदस्यांना भरघोस मतांनी विजयी करुन त्यांच्या हाती संघाची सत्ता दिली.
या नवीन सदस्यांमधून पदाधिकारी निवड सभेत करण्यात आली.त्यामध्ये राजीव यशवंत कीर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली, उपाध्यक्ष म्हणून कांचन विश्वनाथ मालगुंडकर यांची,तर महिला उपाध्यक्ष पदी ॲड.प्रज्ञा दिपक तिवरेकर, सचिव पदी चंद्रहास शंकर विलणकर, सहसचिव अमृता रविंद्र मायनाक, खजिनदार पदी राजेंद्र [आर के] केशव विलणकर, सहखजिनदार विजय पांडुरंग बिर्जे,यांची निवड करण्यात आली.
तसेच निवडणुकीत दिलीप सदानंद भाटकर,अस्मिता [दयाताई] सुशील चवंडे, सदानंद [सदा] बाबी मयेकर, अनंत यशवंत भाटकर, निलेश गणपत बिर्जे, दिपक दत्ताराम तोडणकर, भालचंद्र सुभाष नागवेकर, आदेश [आबू] शशिकांत भाटकर, अशोक कृष्णा भाटकर, संतोष मनोहर मयेकर, स्वप्नील सुधाकर सुर्वे,अनिरुद्ध [अनू] किशोर भुते, आनंद रत्नकांत भाटकर व नितीन जगन्नाथ तळेकर हे नवीन कार्यकारिणी सदस्य म्हणून निवडून आले.