
मानसकोंड येथे बांधकामगार नोंदणीचा ८० लोकांनी घेतला लाभ
पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या माध्यमातून नवनिर्मिती फाउंडेशने आयोजित केला कॅम्प
संगमेश्वर:संगमेश्वर तालुक्यातील मानसकोड किंजळेवाडी हनुमान मंदिर या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या माध्यमातून बांधकामगार नोंदणीचा कॅम्प आयोजित करण्यात आला होता. या कॅम्पचा लाभ या वाढीतील ८० लोकांनी घेतला असुन यावेळी ग्रामस्थांनी पालकमंत्री ना.उदय सामंत यांचे आभार मानले.
बांधकामगार नोंदणीचा उपक्रम आज मानसकोड येथे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या माध्यमातून नवनिर्मिती फाउंडेशनच्या प्रयत्नाने घेण्यात आला होता.कामगारांच्या हितकल्याणकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्मिती फाउंडेशन गेले अनेक वर्ष करत आहे. संस्थेच्या माध्यमातून कामगारांच्या कल्याणासाठी सुमारे हजारो लोकांनी नोंदणी केली असल्याचेही यावेळेस सांगण्यात आले. ग्रामीण भागातील गावांपर्यंत योजना पोहोचत नाहीत त्यामुळे नवनिर्मिती फाउंडेशनने ग्रामीण भागातील लोकांपर्यंत योजना पोहोचावेत यासाठी प्रयत्न करत आहेत. यावेळेस पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या माध्यमातून शासनाच्या सर्व तो योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचा मानस संस्थेचे अध्यक्ष रमजान गोलंदाज आणि संचालक जमूरत अलजी यांनी केला आहे. या कार्यक्रमाच्या मदतीसाठी श्री शिगवण आणि श्री शेलार यांनी महत्वपूर्ण मदत केली.यावेळी यावेळी सामाजिक कार्यकर्ते जमूरत अलजी,रमजान गोलंदाज,सलाऊद्दीन बोट,दिनेश नींगावले,सुहास किंजळे,आदी सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.