
श्रीमान भागोजीशेठ कीर भंडारी समाज पॅनलचा मांडवी येथील कार्यालयात केला सत्कार
रत्नागिरी :रत्नागिरी जिल्हा परीट समाज सेवा संघाकडून
नवनिर्वाचित श्रीमान भागोजीशेठ कीर भंडारी समाज पॅनलचे दणदणीत विजयानंतर पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
त्यावेळी परीट समाजाचे अध्यक्ष राजेंद्र नेरकर, सल्लागार प्रभाकर कासेकर, उपाध्यक्ष अमित कोरगावकर, प्रीतम पावसकर, विश्वास कोरगांवकर, कृष्णा तवसाळकर, संकेत कासेकर, प्रसाद म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते
या वेळी पॅनल चे प्रमुख राजीवजी कीर, कांचन मालगुंडकर, चंद्रहास विलणकर,राजेंद्र विलणकर, दिलीप भाटकर, सदानंद मयेकर, अमृता मायनाक, निलेश बिर्जे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आम्ही सर्वजण समाजाच्या हितासाठी सतत कार्यरत राहू असे अभिवचन नवनिर्वाचित सदस्यांनी देवून रत्नागिरी जिल्हा परीट समाज सेवा संघाचे आभार मानले.