
पोलिसाच्या अल्पवयीन मुलाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथे पोलिस वसाहतीत राहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याच्या अल्पवयीन मुलाचा आकस्मिक मृत्यू झाला. सदर घटना शुक्रवारी (ता. २८) सकाळी एका खासगी रुग्णालयात घडली. सोहम प्रमोद यादव (वय १२, रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे.
गुरूवारी (ता. २७) सोहमच्या छातील दुखू लागल्याने त्याच्या पालकांनी त्याला रात्री खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी उपचारांदरम्यान सोहमचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला होता.