
बेकायदेशिरपणे गावठी दारु विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल
रत्नागिरी:- तालुक्यातील मालगुंड भाटलेवाडी येथील जंगलमय परिसरात बेकायदेशिरपणे गावठी दारु विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगणाऱ्या विरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवार २७ जुलै रोजी सायंकाळी ६.२० वा. करण्यात आली. संतोष सुधाकर सुर्वे (रा. मालगुंड, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
गुरुवारी सायंकाळी जयगड पोलिस मालगुंड परिसरात गस्त घालत असताना त्यांना भाटलेवाडी केशवसुत स्मारकाचे मागील बाजुस जंगलमय भागात संशयित गावठी दारु विक्री करताना दिसून आला. पोलिसांनी त्याठिकणी धाड टाकून ही कारवाई केली. त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ ई अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.