
वेश्या व्यवसाय प्रकरणात चौथ्या आरोपीला देवरुख येथून अटक
रत्नागिरी :शहरातील सिद्धिविनायकनगर येथे वेश्याव्यवसाय सुरू असलेली प्रकार शहर पोलिसांनी उघड केल्यानंतर या छापेमारीतून धक्कादायक बाबी पुढे येऊ लागल्या आहेत. या प्रकरणात अनेक बडे हस्ती गुंतलेल्या असल्याचे पुढे येत असून या प्रकरणातील चौथा आरोपी समिर मंगेश लिंबुकर (वय २३, रा.देवरुख, सध्या आरोग्य मंदिर) याला शहर पोलिसांनी अटक केली आहे. आता या प्रकरणात आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आले आहे. उसण्या घेतलेल्या आर्थिक व्यवहारातून हा व्यवसाय येथे सुरू झाली चचा आहे. वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या तरुणींवर प्रचंड अत्याचार करण्यात आल्याचेही पुढे आले आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.
चार दिवसापूर्वी रत्नागिरी शहर पोलिसांनी सिद्धिविनायक नगर येथे एका फ्लॅटवर छापा टाकून वेश्याव्यवसाय करण्यासाठी आणलेल्या दोन मुलींची सुटका करत राजेंद्र रमाकांत चव्हाण ( रा. मिरजोळे) या तरुणाला पोलीसांनी अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणात गुंतलेल्या अब्दुल मतीन हसनमियाँ डोंगरकर (रा.माळनाका), ओमकार जगदीश बोरकर (रा. चिंचखरी) दोघांना अटक केली होती. त्यांनी दिलेल्या माहितीवरून चौथ्या आरोपीला बुधवारी दुपारी शहर पोलिसांनी अटक केली आहे.
सिद्धिविनायक नगर येथील फ्लॅटसहित अन्य बंद बंगल्यांमध्ये नेऊन तरुणीवर प्रचंड अत्याचार करण्यात आल्याचे चौकशीत पुढे येत आहे. या प्रकरणात रत्नागिरी शहरातील बडया हस्तींचा समावेश असल्याचेही पुढे आले असून येत्या काही दिवसात त्यांची नावे उघड होण्याची शक्यता आहे. शहर पोलीस या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणार आहेत का? असा सवाल रत्नागिरीकर विचारत आहेत.