
श्रीमान भागोजीशेठ कीर भंडारी समाज पॅनल”चा दणदणीत विजय
रत्नागिरी :- रत्नागिरीत मानाच्या समजल्या जाणाऱ्या “रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघा”च्या इतिहासातील पहिल्या निवडणूकीत “श्रीमान भागोजीशेठ कीर भंडारी समाज पॅनल”ने विरोधी “आम्ही भंडारी” पॅनलचा अक्षरशः धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळवला. विरोधकांनी लादलेल्या या निवडणुकीत “श्रीमान भागोजीशेठ कीर भंडारी समाज पॅनल”चे सर्वच्या सर्व 20 उमेदवार विजयी झाले. त्यामुळे विरोधी पॅनलला मतदारांनी सर्वार्थाने नाकारल्याचे यावरून स्पष्ट झाले.
या निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान राजू कीर, कांचन मालगुंडकर, अस्मिता सुशील चवंडे हे तिन्ही उमेदवार पहिल्यापासूनच आघाडीवर होते. या उमेदवारांना सर्वाधिक मते मिळाली. या निवडणुकीत “श्रीमान भागोजीशेठ कीर भंडारी समाज पॅनल”ला सुमारे 70% मतदान झाले.
या निवडणुकीबाबत मत व्यक्त करताना राजू कीर म्हणाले की, विरोधी पॅनलतर्फे ही निवडणूक मतदारांवर लादण्यात आली होती. आम्ही निवडणूक न होण्यासाठी मोठे प्रयत्न केले. मात्र विरोधकांतर्फे ते झिडकारण्यात आले. खरंतर तरीही निवडणूक लढण्यासाठी माझं मन तयार नव्हते. मात्र समाजसंघासाठी आम्ही रक्ताचं पाणी केलेय. तो असा सहजासहजी विरोधकांच्या हाती देणे योग्य वाटले नाही आणि आपण लढायचं असं ठरवलं. यासाठी माझा सहकारी कांचन मालगुंडकर याने मला अधिक प्रोत्साहन दिले. या निवडणुकीसाठी त्याने अतोनात मेहनत घेतली. सर्व उमेदवारांनी पाऊस पाण्याचा विचार न करता मोठ्या हिरहिरीने प्रचारकार्य केले. याचे फलित म्हणून आम्ही ही निवडणूक जिंकली. श्रीमान भागोजीशेठ यांची पुण्याई आणि श्रीदेव भैरीबुवाचा आशिर्वाद आम्हाला लाभला, असे मी यानिमित्ताने सांगू इच्छितो असे राजू कीर यांनी सांगितले.
भंडारी समाजसंघाची दरवर्षी बिनविरोध निवड होत होती. मात्र यंदा प्रथमच समाजसंघाची निवडणूक झाली. 23 जुलै रोजी खालची आळी येथील भैरव मंगल कार्यालयात मतदान पार पडले. सायंकाळी मतदान संपल्यावर त्वरित मतमोजणी करण्यात आली आणि रात्री उशिरा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये “श्रीमान भागोजीशेठ कीर भंडारी समाज पॅनल”ने भंडारी समाजसंघावर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.
“श्रीमान भागोजीशेठ कीर भंडारी समाज पॅनल”चे विजयी उमेदवार खालीलप्रमाणे :-
◆ राजीव यशवंत कीर
◆ कांचन विश्वनाथ
मालगुंडकर
◆ अस्मिता सुशील चवंडे
◆ ऍड. प्रज्ञा दीपक तिवरेकर
◆ दीपक दत्ताराम तोडणकर
◆ भालचंद्र सुभाष नागवेकर
◆ निलेश गणपत बिर्जे
◆ विजय पांडुरंग बिर्जे
◆ अनंत यशवंत भाटकर
◆ अशोक कृष्णा भाटकर
◆ आदेश शशिकांत भाटकर
◆आनंद रत्नाकांत भाटकर
◆ दिलीप सदानंद भाटकर
◆ अनिरुद्ध किशोर भुते
◆ सदानंद बाबी मयेकर
◆ संतोष मनोहर मयेकर
◆ अमृता रवींद्र मायनाक
◆ चंद्रहास शंकर विलणकर
◆ राजेंद्र केशव विलणकर
◆ स्वप्निल सुधाकर सुर्वे