रेल्वे प्रवाशाच्या बॅगेवर अज्ञाताचा डल्ला
रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशाची बॅग अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना गुरूवारी रात्रीच्या सुमारास रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे घडली. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे 20 जुलै 2023 रोजी कोकण रेल्वे मार्गावरील एलटीटी कोचुवली एक्सप्रेस गाडीने प्रवास करत होते. गाडी रत्नागिरी रेल्वेस्टेशन लगत आली असता चोरट्याने तक्रारदार यांची सीटवर ठेवलेली बॅग लांबवली, अशी तक्रार रत्नागिरी शहर पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांनी चोरट्याविरुद्ध भादंवि कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला.