पावस-खारवीवाडा येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या
रत्नागिरी:- तालुक्यातील पावस-खारवीवाडा येथे तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री 2 च्या सुमारास घडली. चिंतामणी भिवा डोर्लेकर (44, ऱा पावस खारवीवाडा) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंतामणी डोर्लेकर हे मानसिक आजारी होते. त्याच्यावर रत्नागिरीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार केले जात होते. मानसिक आजारातूनच त्यांनी 21 जुलै 2023 रोजी रात्री 2 च्या सुमारास राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणी पुढील तपास पूर्णगड सागरी पोलिसांकडून करण्यात येत आहे.