
खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या पालशेत शाखेचे 23 जुलै रोजी उद्घाटन
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा स्थरावरील खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या पालशेत शाखेचा उद्घाटन सोहळा रविवार दिनांक 23 जुलै2023 रोजी सकाळी 11.30 वा.मा.श्री.महेश जी नाटेकर, अध्यक्ष, गुहागर तालुका खारवी समाज विकास समिती यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान पतसंस्थेचे अध्यक्ष श्री संतोष जी पावरी भूषविणार आहेत
श्री माधव बापट यांचा गाळा क्रमांक दोन, म्हसोबा मंदिरा जवळ,मु.पो.पालशेत,तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी हा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून सौ संपदाताई चव्हाण. सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत पालशेत निओशी,सुधीर कांबळे,दुय्यम निबंधक( प्रशासन) सहकारी संस्था,रत्नागिरी जिल्हा, प्रभाकर शिरगावकर,अध्यक्ष,खारवी समाज गट क्रमांक तीन, श्रीमती प्रेरणा ताई शिरगावकर ,अध्यक्षा महिला मंडळ, गुहागर तालुका खारवी समाज विकास समिती, सिताराम पटेकर, अध्यक्ष,अखिल महाराष्ट्र खलाशी, कष्टगिरी महासंघ, चैतन्य धोपावकर अध्यक्ष,गुहागर तालुका, सरपंच संघटना हे प्रमुख उपस्थिती लावणार आहे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
त्यानिमित्त सर्व सभासद व हितचिंतक बंधू-भगिनींनी या उद्घाटन सोहळा कार्यक्रमा साठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुधीर वासावे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद खडपे अन्य संचालक बंधू-भगिनी, प्रशासन वर्ग व समन्वय समिती सदस्य यांनी केले आहे.