
संगमेश्वर पोलिसांनी डिझेल चोरी करणाऱ्या दोन संशयितांना घेतले ताब्यात
संगमेश्वर:मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाची काम करणाऱ्या जेसीबी मधील डिझेल चोरी करणाऱ्या दोन संशयित आरोपींना संगमेश्वर पोलिसांनी पकडले असून त्यांच्याकडील डिझेलसह 63 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकाने ही चोरी उघडकीस आणली आहे. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कांबळे, खोंदल आणि चालक जाधव यांनी ही कामगिरी केली आहे.
याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार दि 18 जुलै रोजी रात्रीच्या दरम्याने एसीई कंपनीचा जेसीबीची नंबर एम एच 08 ए एन 2418 हा नेहमीप्रमाणे कळंबत्ये मोहल्ला जवळ हायवे रोडच्याकडेला जेसीबी चे काम चालू होते. रात्रीच्या कामाकरता जेसीबी ला लागणारे एकूण लिटर डिझेल हे प्रत्येकी 60 लिटर मापाच्या कॅनने असे तीन कॅन भरून ठेवले होते. परंतु रात्री जेसीबीने काम करण्यात आले नसल्याने शिल्लक डिझेल पुढील काम करता ठेवण्यात आले होते.
बुधवार दि 19 जुलै रोजी 7 वाजता दरम्याने त्या ठिकाणी तीन कॅन मधील अंदाजे 150 लिटर डिझेल कोणीतरी अज्ञात व्यक्तीने काढून घेतल्याचे लक्षात आले होते. याबाबत चिपळूण पोलीस ठाणे जयंतीलाल घेवर चंदनानेचा याने अज्ञात इसमाविरुद्ध फिर्याद दिली होती. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस हे.कॉन्स्टेबल कांबळे आणि पोलीस खोदल आणि चालक जाधव हे दि.19 जुलै रोजी रात्री गस्त घालीत असताना 1वाजून 15 वाजण्याच्या दरम्याने संगमेश्वर तालुक्यातील कोंडीवरे केंबलेवाडीकडे जाणारा रोड लगत एक लाल रंगाची गाडी मॅक्सिमो गाडी या गाडीमध्ये दोन व्यक्ती हातामध्ये दोन प्लास्टिकचे कॅन आढळून आले. कॅनमध्ये काय असे विचारले असता गाडी चालक राजेंद्र कृष्णा भुवड कोंडीवरे केंबळेवाडी तसेच त्याच्यासोबत विनोद वसंत हेमंत यांनी सदर गाडी मधील डिझेल हे मोसिन राहणार चिपळूण यांनी दिनांक 18 जुलै रोजी कळंबत्ये तालुका चिपळूण येथे दिल्याने ते घेऊन कोंडीवरे केंबलवाडी येथे आणल्याचे सांगितले.
पोलिसांनी अधिक माहिती घेतल्यानंतर त्यांच्याकडे 10,176 रुपयाचे डिझेल, 664 किमतीचे डीझेल तसेच 1930 रुपये किमतीचे डिझेल आणि 965 रुपये किमतीचे दहा लिटर मापाचा सफेद कॅन मध्ये डिझेल तसेच रंगाची महिंद्रा मॅक्झिमो गाडी असा एकूण 63 हजार 835 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे तसेच राजेंद्र कृष्णा भुवड आणि विनोद वसंत हेमन ताब्यात घेतले आहे. संगमेश्वर पोलिसांनी चिपळूणमुळे झालेल्या डिझेल चोरीचा छडा लावला आहे.