
वाईन मार्टच्या बाहेरच मद्यप्राशन करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी: शहरातील आठवडा बाजार येथील वाईन मार्टच्या बाहेर सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करण्यासाठी बसलेल्या दोघां विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई सोमवार 17 जुलै रोजी रात्री 9.15 वा.करण्यात आली.
तेजस प्रकाश नाखरेकर (30,रा,रत्नागिरी) आणि मंगेश चंद्रकांत शेट्ये (45,रा.रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.त्यांच्याविरोधात पोलिसांनी दिलेल्या तक्रारी नुसार,सोमवारी रात्री शहर पोलिस आठवडा बाजार येथ्ाून गस्त घालत असताना नगर परिषदेचे दुकान गाळे असलेल्या इमारतीच्या मागे जोशील वाईनमार्टच्या बाहेर संशयित हे बियरची बाटली घेउन पिण्यासाठी बसलेले असताना ही कारवाई करण्यात आली.त्यांच्याविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 84 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.