
तिहेरी अपघातप्रकरणी मोटारचालकावर गुन्हा दाखल
चिपळूण:- चिपळूण-गुहागर मार्गावरील कोंढे येथे गेल्या मंगळवारी दोन मोटारी आणि रिक्षामध्ये झालेल्या तिहेरी अपघातप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात मोटारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या अपघातात एकूण ९ जण जखमी झाले.
त्यात दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दानीश नवाज मुकादम (पेठमाप) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. गुहागर-कोंडकारूळ येथील सुभाष कृष्णा अडुरकर (३६), सिया सुभाष अडूरकर (२९), सुरेंद्र सुधीर मोरे (३१, वेळणेश्वर), अमान अजिम मुरूडकर (५), उर्वी विराज जावकर (२०), प्रतिक प्रभाकर (२४), रिया प्रतीक जावकर (२१), रुद्र अनंत भारद्वाज (६), रिक्षाचालक संजय अनंत साबळे (कोंढे) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.