
राज्य अधिस्वीकृती समितीवर जान्हवी पाटील तर विभागीय समितीवर प्रणव पोळेकर यांची निवड
रत्नागिरी :महाराष्ट्र शासनाच्या पत्रकारांच्या राज्य अधिस्वीकृती समितीवर जान्हवी पाटील तर विभागीय अधिस्वीकृती समितीवर कोकण विभागासाठी सदस्य म्हणून प्रणव पोळेकर यांची राज्य शासनाकडून सदस्य म्हणून निवड झाली आहे.
जान्हवी विनोद पाटील या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या उपाध्यक्षा आहेत. याशिवाय शासनाच्या वन स्टॉप सखी सेंटर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणावर अशासकीय सदस्य म्हणून त्यांची नेमणूक झाली आहे.
पत्रकारितेतील त्यांच्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना तीनवेळा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. त्यांच्या निवडीबद्दल सामाजिक क्षेत्राबरोबरच सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. प्रणव पोळेकर झी २४ तास या वृत्तवाहीणीला प्रतिनिधी म्हणून काम करतात. त्यांना पत्रकारिता क्षेत्रात अनेक वर्षांचा अनुभव असून सामाजिक क्षेत्रातही ते कार्यरत आहेत.