
रत्नागिरीत अज्ञात दुचाकीच्या धडकेत तरूण जखमी
रत्नागिरी:- शहरातील मारूती मंदिर परिसरातील खाऊगल्लीसमोरील रस्त्यावर अज्ञात दुचाकीच्या धडकेत तरूण जखमी झाला. ही घटना 4 जुलै 2023 रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास घडली श्रीकृष्ण अनिल जोशी (47, ऱा वरवडे नवेदरवाडी) असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी त्यांनी शहर पोलिसांत अज्ञात दुचाकी चालकाविरूद्ध तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकृष्ण जोशी हे 4 जुलै 2023 रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास खाऊ गल्लीसमोरील रस्त्याच्या बाजूला उभे होते. यावेळी अज्ञात दुचाकी चालकाने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात श्रीकृष्ण जोशी यांना दुखापत झाली. जोशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी अज्ञात दुचाकीचालकाविरूद्ध भादंवि कलम 279, 337, 338 मोटार वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.