
खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या ५ व्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन
रत्नागिरी: खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेचा ५ वा. वार्षिक अहवाल प्रकाशन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
गेली ४ वर्षे प्रतीवर्षी वार्षिक अहवाल प्रकाशन करण्यात येते. याही वर्षी मोठ्या उत्साहात प्रकाशन समारंभ पार पडला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संतोष पावरी उपाध्यक्ष सुधीरजी वासावे, संस्थापकीय अध्यक्ष व विद्यमान संचालक कमलाकर हेदवकर, ज्येष्ठ संचालक वासुदेव वाघे,अन्य संचालक दिनेश जाक्कर,रमेश जाक्कर,सौ.दीप्ती कोलथरकर,सौ.ध्रुवी लाकडे,मदन डोर्लेकर,कृष्णा तांडेल, समन्वय समिती सदस्य विनायक तिमसेकर,मारुती होडेकर,प्रभाकर शिरगावकर,विकास दाभोळकर, अनिल जागकर,प्रकाश नाटेकर व कर्मचारी वृंद उपस्थित होते.