
मनोरुग्णांलय रत्नागिरीच्या रुग्णासाठी दूध खरेदीचे आरोग्य संचालकांनी दिले आदेश
ना.उदयजी सामंत यांच्या आदेशनंतर तात्काळ काढले आदेश
रत्नागिरी :रत्नागिरी येथे असलेल्या मनोरुग्णालयाला पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी नुकतीच भेट देली होती यावेळेस येथे रुग्णांना दुधाच्या वाढलेल्या दरामुळे कोरा चहा पिण्याची वेळ आली होती.मात्र ही बाब पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांच्या लक्षात आल्यावर त्यांचा पारा चांगलाच चढला त्यांनी संबंधित अधिकारी वर्गाला चांगलेच फैलावर घेतले.मनोरुग्णाना अश्या पद्धतीने खाण्या पिण्याच्या बाबतीत हलगर्जी पणा सहन केला जाणार नाही.येथील रुग्ण रुग्णालयात नसून घरात असल्याचा भास त्यांना झाला पाहिजे त्या पद्धतीची व्यवस्था करा असे आदेश दिले.तात्काळ येथील रुग्णांना दूध मिळाले पाहिजे यासाठी फक्त आदेशा देऊन थांबले नाहीं तर त्याचा पाठपुरावा करुन तात्काळ आरोग्य संचालक मुबंई यांनी दूध खरेदी करण्याचे लेखी परिपत्रक काढून येथील रुग्णांची अडचण दुर केली आहे.
रुग्णची समस्या लक्षात घेवून पालकमंत्री म्हणून आदेशदेऊन थांबले नाहीं तर २४ तासात पाठपुरावठा करुन शासकीय दूध येई पर्यत बाहेरून दूध खरेदीचे आदेश काढण्यात पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांना यश आले आहे.यां केलेल्या कामां बद्दल अनेकांनी पालकमंत्री यांचे कौतुक केले.फक्त विकास काम करुन थांबणारे नाहीं तर प्रत्येक घटकांशी नाळ जोडलेला पालकमंत्री असल्याचे उदगार जनतेतून निघत आहेत.