
देव, घैसास,कीर वरिष्ठ महाविद्यालयात हेलियम संवर्धन दिन साजरा
पोस्टर मेकिंग स्पर्धेत नेहा शिंदे प्रथम
रत्नागिरी –भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात आज दि.१० जुलै रोजी आयक्यूएसी व रसायनशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हेलियम संवर्धन दिन’ साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमामध्ये हेलियम मुलद्रव्याचे महत्व, इतिहास, विज्ञान क्षेत्रातील विविध उपयोग, हेलियम संवर्धनाची गरज याविषयी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करण्यात आले व हेलियमबद्दल चित्रफित दाखविण्यात आली. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी हेलियम विषयी माहिती सांगितली.
हेलियम संवर्धन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या पोस्टर मेकिंग स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. पोस्टर मेकिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक नेहा संतोष शिंदे हिने प्राप्त केला तर अनामिका अरविंद गुरव हिने द्वितीय, माधवी प्रकाश शिंदे हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला या विद्यार्थीनींचा प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. स्पर्धेचे परीक्षण प्रा. विनय कलमकर यांनी केले.
महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी उपप्राचार्या सौ.वसुंधरा जाधव, विज्ञान शाखाप्रमुख प्रा. वैभव घाणेकर, रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. आसावरी मयेकर,प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली जोशी यांनी केले तर प्रा. मिथिला वाडेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य प्रा. विनय कलमकर यांनी केले.