
स्वरूपानंद पत संस्थेच्या ठेव वृद्धि मासाच्या पहिल्या15 दिवसात 8 कोटीं च्या ठेवी उर्वरित कालावधीत 15 कोटीच उद्दिष्ट पार करणार : दीपक पटवर्धन
रत्नागिरी :15 कोटींचे ठेव उद्दिष्ट घेऊन स्वरूपानंद पत संस्थेच्या ठेव वृद्धि मासाचा प्रारंभ झाला आणि ठेवीदारांच्या प्रतिसादाने भारावून गेलो. पहिल्या 18 दिवसात 8 कोटी 49 लाखांच्या नव्या ठेवी जमा झाल्या. 17 ही शाखांमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद प्राप्त होत असून जुन्या ग्राहक ठेवीदारां प्रमाणेच नवे ठेवीदार संस्थे जवळ जोडले जात आहेत.
भक्कम आर्थिक प्रमाणे
272 कोटींचा ठेव टप्पा संस्थेने गाठला असून 125 कोटीच्या सुरक्षित गुंतवणुका करतानाच 193 कोटींचा कर्ज टप्पा ओलांडताना पहिल्या 3 माही अखेर 99.35% वसुली केली आहे.36 कोटींचा स्वनिधी आता 38 कोटीं कडे झेपावत आहे. गत आर्थिक वर्ष्यात 6 कोटींची वेस निव्वळ नफ्याचे ओलांडली असून निधी व्यवस्थापन आणि उपलब्ध निधीचा सर्वोत्तम वापर करत नफ्याचे प्रमाण वाढवण्यात यश प्राप्त केले आहे.
सुरक्षिततेला प्राधान्य
संस्थेच्या ठेव योजना आकर्षक तर आहेतच पण स्वरूपानंद पत संस्था सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आली आहे.ठेवीदारांनी स्वरूपानंद पत संस्थेच्या ठेव योजने मध्ये मोठी गुंतवणूक करावी असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अँड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.