
आंबा घाटातील अपघात प्रकरणी टँकर चालकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी: रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात गॅस टँकर दारू पिऊन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकावर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
देवरुख पोलीस ठाण्यातुन मिळालेल्या माहितीनुसार जनार्दन बडे हा आपल्या ताब्यातील अंबिका ट्रान्सपोर्ट कंपनी लिहिलेला एल पी जी गॅस टँकर (जी जे १२ ए टी ७५९७ ) पुणे ते जयगड असा जात असताना आंबा घाटातील वळणावर आला असता अपघात झाला. हा अपघात काल दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास झाला. रात्री देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
टँकर चालक दारू पिऊन वाहन चालवल्या प्रकरणी व स्वतःच्या जीवितास धोका होईल असे वाहन चालविल्याने साखरपा पोलिसांनी कारवाई केली.