
43 हजार सभासदांच्या सहभागातून साकारले स्वरूपानंद पतसंस्थेचे यश : अँड. दीपक पटवर्धन
रत्नागिरी :33 वर्ष अखंड प्रगतीची वाटचाल करणाऱ्या स्वरूपानंद पत संस्थेचे यश हे व्यापक जनाधारात सामावले ले आहे. 300 सभासद ते 43 हजार सभासद ही केवळ संख्या नाही तर इतक्या व्यक्तीसमूहाचा एकजिनसी सहकार हुंकार प्रचंड ऊर्जानिर्मिती करतो ह्याच बोलकं उदाहरण म्हणजे स्वरूपानंद पत संस्था. असे भावोद्गार स्वरूपानंद पत संस्थेचे अध्यक्ष अँड. दीपक पटवर्धन यांनी काढले.
बळकट आर्थिक साम्राज्य
272 कोटींच्या ठेवी त्या साठी 21 हजार च्या घरात असलेली ठेव खाती 33 वर्ष्यातला हा सातत्यपूर्ण प्रवास आणि त्यातले 43 हजार सहप्रवासी यांनी स्वरूपानंदच विश्वासार्ह आर्थिक साम्राज्य उभे राहिले.
ठेव वृद्धि मास हा उत्सव
25 वर्ष्या पूर्वी ठेव वृद्धि मास ही संकल्पना सर्वत्र रूढ झालेली नव्हती. स्वरूपानंद च्या या संकल्पनेला कोणी ही गांभीर्याने घेतले नव्हते. पण आता ठेव वृद्धीमासाची वाट पाहणारे शेकड्यानी ग्राहक आज ठेव वृद्धि मांसाची संकल्पना समाजमनावर कोरली गेली आहे याची प्रचिती देतात. प्रारंभी ठेव वृद्धि अभियानात केवळ 3 लाख जमा झाले. त्याचेही खूप अप्रूप वाटले. गावोगावी फिरून ठेव जमवण्यासाठी केलेला संपर्क हळूहळू प्रतिसादास पात्र झाला.25 वर्षा पूर्वीचे ठेवीदार आजही पत संस्थेजवळ निगडित आहेत ही खुप बोलकी गोष्ट आहे.आज कोट्यवधींच्या ठेवी जमा होतात या ठेव वृद्धि मासात केवळ 18 दिवसात 8 कोटी ठेवी जमा झाल्या आता ठेव वृद्धीमास हा केवळ उपक्रम राहिला नाही तर तो उत्सव झाला आहे. स्वरूपानंद मध्ये ठेव ठेवण्याची परंपरा नव्हे वार्षिक व्रत झाले आहे.
व्रतस्थ वर्तनातून निर्माण झालेल जनसमर्थन
हा व्यापक जनाधार निर्माण करण्यासाठी आर्थिक शिस्त, प्रामाणिक सातत्यपूर्ण प्रयत्न, विश्वासार्ह व्यवहार व वर्तणूक, ग्राहक सेवा या कसोट्या सातत्याने पार कराव्या लागल्या आहेत. स्वरूपानंद च काम हे एक व्रत आहे. व्रतस्थ भूमिकेतून ते निभावल्या मूळे हे अर्थकारण यशस्वी राहिले आहे.
. 15 कोटींचे उद्दिष्ट
चालू असलेल्या ठेव वृद्धि मासात किमान 15 कोटींचा ठेव इष्टांक पूर्णकरण्या साठी स्वरूपानंद ची जनमानसातील स्वच्छ प्रतिमा आणि व्यापक जनाधार परिणामकारक राहील असा विश्वास स्वरूपानंद पत संस्थेचे अध्यक्ष अँड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला आणि स्वरूपानंद पत संस्थेच्या ठेव योजनांमध्ये मोठी गुंतवणूक करण्या चे आवाहन त्यांनी केले आहे.