
शिरगांव ग्रामपंचायतच्या विविध विकासकामाचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन
शिरगांवच्या विकास कामांसाठी तब्बल १७ कोटीच्या निधीला मंजुरी
रत्नागिरी: तालुक्यातील शिरगांव ग्रामपंचायतच्या विकासकामासाठी पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्याकडून तब्बल १७ कोटीचा निधीला मंजुरी देत शनिवारी भूमिपूजन सपन्न झाला.यावेळेस गावातील विविध विकास कामांबाबत आढावा घेतला.यावेळी शिरगांव आढी मधील ग्रामस्थांनी शाळा दुरुस्ती,अंगणवाडीसाठी निधी मागितला तों ही निधी देण्याचे आश्वासन पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी दिले आहे.त्याचा प्रमाणे शिरगांवच्या विकासाला निधी कमी पडू देणार नसल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.

यावेळी सरपंच फरीदा काजी,उपसरपंच तथा अल्पसंख्यांक तालुक प्रमुख अल्ताफ संगमेश्वरी युवा जिल्हा प्रमुख केतन शेट्ये,युवा तालूका प्रमुख तुषार साळवी,युवा सेना जिल्हा प्रमुख केतन शेट्ये,युवा तालुकां प्रमुख तुषार साळवी,विभाग प्रमुख परेश सावंत,परेश कुमटेकर, तात्या सावंत,ग्रामपंचायत सदस्य शकील मोडक,आदी ग्रामपंचायत सदस्य,पदाधिकारी,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.