
सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी :शहरातील साळवीस्टॉप येथे सार्वजनिक ठिकाणी बिअर पिण्यासाठी बसलेल्या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवार ६ जुलै रोजी रात्री ८.३० ते ८.४५ वा. कालावधीत करण्यात आली.
अभिजित अनंत लोंढे आणि मोहम्मद मोकी मोहम्मद शकिल (दोन्ही रा. रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. गुरुवारी रात्री शहर पोलिसांचे पथक गस्त घालत असताना त्यांना साळवी स्टॉप येथील स्वप्नील बिअर शॉपीच्याबाहेर एका दुकान गाळ्याच्या आडोशाला सार्वजनिक ठिकाणी बिअर पिण्यासाठी बसलेले दिसून आले. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कायदा कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.