
नमन कलावंतांच्या बैठकीत लोककला संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक निर्णय
रत्नागिरी :जिल्ह्यातील नमन कलावंतांना आज अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून नमन लोककला संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय नमन लोककला मंडळ रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आले आहे. शासनाकडून वृद्ध कलाकारांना मानधन मिळवण्यासाठी असलेली 48 हजारापर्यंतची उत्पन्न मर्यादा वाढविण्यात यावी. त्याचबरोबर त्याचबरोबर शासकीय मानधन मिळण्याचा नमन कलावंतांसाठी असलेला ‘क’ वर्गाचा दर्जा ‘ब’ वर्गात मानधन मिळावे असा ठराव करण्यात आला आहे.
देवरुख येथे नमन लोककला मंडळ रत्नागिरी जिल्हा कार्यकारणी बैठक बुधवारी जिल्हाध्यक्ष पभाकर (पी.टी.) कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत या सभेमध्ये प्रथम मृत झालेल्या झालेल्या कलाकारांना संघटनेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. उत्कृष्ट कामगिरी करणाऱया नमन कलावंताच्या अभिनंदनाचे ठराव सुद्धा सदस्यांनी सूचित केल्याप्रमाणे घेण्यात आले. त्यानंतर मागील सभेचे इतिवृत्त सचिव परशुराम मासये यांनी वाचून दाखवले. त्याला उपस्थित सर्व सदस्यांनी मंजुरी दिली. या सभेमध्ये नमन लोककला संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वपूर्ण विषयावरती चर्चा करण्यात आली.
संगमेश्वर तालुका मंडळ कार्यकारिणी आणि युत्युसू आर्ते यांनी सभेचे आयोजन केले होते. यावेळी आर्ते यांनी उपस्थितांना डायरी आणि पेन देत स्वागत केले. त्यानंतर मागील सभेत झालेल्या विषयांवर चर्चा झाली. नमन मंडळांना प्रयोग सादर करताना किंवा प्रवासात काही अडचणींना मागील काळात नमन कलावंतांना सामोरे जावे लागत होते. रात्रीच्यावेळी नमन मंडळ व कलावंताना पवासादरम्यान पासची सुविधा उपलब्ध होत नसल्याने या समस्येला सामोरे जावे लागत होते. पण कोकण लोककला नमन मंडळाने ते पास मिळण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यांमुळे होणारी गैरसोय दुर झाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
या बैठकीत जिल्हा संघटनेचे तालुक्यातून सदस्य नोंदणी करणे बंधनकारक यावर ते विचारविनिमय करण्यात आला. या प्रश्नावर मंडळाचे उपाध्यक्ष मोहन घडशी आणि इतर सदस्यांनी आग्रहाची मागणी केली. वृध्द नमन कलाकारांना शासनाकडून यावर्षी मिळणाऱया मानधनाचा आढावा घेण्यात आला. यावर्षी रत्नागिरी जिह्यातील 54 कलाकाराना मानधनाच्या पस्तावांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी सांगितले. यासाठी जिल्हाअध्यक्ष कांबळे वारंवार पशासन व लोकपतिनिधींशी संपर्प व पाठपुरावा करत आहेत. जास्तीत जास्त कलाकारांना मानधनसाठी संघटनेच्या माध्यमातून करत असलेल्या पयत्नांविषयी उपस्थितांनीही समाधान व्यक्त केले.
आज वृद्ध कलाकारांना मानधनाचा लाभ घेण्यासाठी उत्पन्न 48 हजार पर्यंत असावे अशी शासनाची अट आहे. मात्र, ही उत्पन्न मर्यादा वाढवून मिळावी अशी सूचना उपस्थित सर्व कार्यकारिणी सभासदांनी केली. त्याचबरोबर वृध्द कलावंताना मानधन मिळण्याचे अ,ब आणि क असे वर्ग आहेत. पण नमन कलावंत क वर्गात मोडत आहेत. त्यासाठी या कलावंतांना ‘ब’ वर्गात समावेश करून त्याला मानधन मिळावे यासाठी प्रयत्न करण्याचा ठराव या बैठकीत करण्यात आला आहे. जिल्हाअध्यक्ष पभाकर कांबळे यांनी या सभेत उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले तर आभार युयुत्सु आर्ते यांनी मानले. या बैठकीला कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी तसेच सदस्य उपस्थित होते.