
रत्नागिरीतील आरोग्य सेवेला सर्वोच्च दर्जा प्राप्त करून देणारे डॉक्टर्स आमच्यासाठी प्रेरणादायी : डॉ. तोरल शिंदे
आयएमएने केला रत्नागिरीतील ज्येष्ठ डॉक्टर्सचा सन्मान
रत्नागिरी:- रत्नागिरीतील वैद्यकीय सेवेला एक सर्वोच्च दर्जा प्राप्त करून देतानाच इथे येणाऱ्या प्रत्येक डॉक्टरला आपलसं करून सर्वांनाच संघटीत ठेवणाऱ्या सर्व ज्येष्ठ डॉक्टर्सचे योगदान हे आमच्यासाठी एखाद्या दिपस्थंभा सारखे आहे असे प्रतिपादन इंडियन मेडिकल असोसिएशनच्या रत्नागिरीच्या अध्यक्षा डॉ. तोरल शिंदे यांनी केले.
डॉक्टर्स डे ला १९७६ पासून आत्तापर्यंतच्या आयएमएच्या सर्व माजी अध्यक्षांचा सन्मान करण्यात आला . यावेळी रत्नागिरीतील ज्येष्ठ डॉक्टर्सचा आयएमए कडून सन्मान करण्यात आला. यामध्ये ज्यांनी रत्नागिरीत २५ वर्षांहून अधिक काळ रत्नागिरीत वैद्यकीय सेवा केली आहेत अशांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. तोरल शिंदे बोलत होत्या. रुग्णाच आयुष्य वाचवण्यासाठी शेवटच्या शक्यते पर्यंत प्रयत्न करणाऱ्या डॉक्टर्ससाठी त्याचा पेशा हा सर्वात महत्वाचा असतो. डॉक्टरची प्रत्येक क्षणाला कसोटी असते. लोक आपल्याला देव म्हणतात, डॉक्टर्स डे ला आपल कौतुक करतात पण त्याहीपेक्षा एखाद्या रुग्णाच्या चेहऱ्यावर हास्य येते तो दिवस आपल्यासाठी सर्वात आनंददायी असतो. हेच रुग्णसेवेचे व्रत रत्नागिरीत
अनेक अडचणींचा सामना करत गेली २५ वर्षांपेक्षाही अधिक ज्यांनी सुरु ठेवले, इथल्या नागरिकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले ते सर्वच सिनियर्स कायमच आमच्यासाठी दिपस्थंभ आहे. त्याचवेळी एकीकडे रुग्णसेवा असतानाचा डॉक्टर्सना एकत्रित ठेवणे, त्यांना संघटन हीच ताकद आहे याची जाणीव करून देणे ही जबाबदारी स्वीकारणाऱ्या सर्वच माजी आयएमए अध्यक्षांच्या योगदानाबद्दल तितकाच आदर आहे असे प्रतिपादन डॉ. शिंदे यांनी केले.
यावेळी माजी आय एम ए अध्यक्ष डॉ. सामंत, डॉ. रमेश चव्हाण, डॉ. अलीमिया परकार,डॉ. सुनिता चव्हाण, डॉ. व्ही.डी. जोशी, डॉ. शाश्वत शेरे, डॉ. प्रसाद पेठे, डॉ. चंद्रशेखर केळकर, डॉ. उदय वंडकर, डॉ. संतोष बेडेकर, डॉ. अपराध, डॉ. अशोक प्रभुदेसाई, डॉ. अर्जुन नलावडे, डॉ. नटराज पवार, डॉ. गोंधळीकर, डॉ. शैलेन्द्र भोळे, डॉ. मुनीर म्हैसकर, डॉ. सौ. दीपा पावसकर, डॉ. मिलिंद पटवर्धन, डॉ. सुधांशू मेहता, डॉ. कुष्णा पेवेकर, डॉ. मेधा गोंधळीकर, डॉ. गिरीश बेडेकर, डॉ. दत्तप्रसाद केतकर, डॉ. अतुल देशपांडे, डॉ. कीर्ती पिलणकर, डॉ. कल्पना मेहता, डॉ. रश्मी आठल्ये, डॉ. निलेश शिंदे, डॉ. पराग पाथरे, डॉ. निनाद नाफडे, डॉ. निशा नाफडे, डॉ. निलेश नाफडे यांचंही सन्मान करण्यात आला.
तर २५ वर्ष रुग्ण सेवा केलेल्या सर्व डॉ. सुप्रिया भोळे, डॉ. निलेन्द्र भोळे, डॉ. विद्यागौरी भोळे, डॉ. मंगला चौहान, डॉ. उमेश चव्हाण, डॉ. अतुल देशपांडे, डॉ. रत्ना जोशी, डॉ. महेश केळकर, डॉ. दत्तप्रसाद केतकर, डॉ. विजय माने, डॉ. पौर्णिमा मुकादम, डॉ. अविनाश मुकादम, डॉ. निनाद नाफडे, डॉ. निलेश नाफडे, डॉ. नटराज पवार, डॉ. उज्ज्वला पवार, डॉ. कृष्णा पेवेकर, डॉ. माधुरी पेवेकर, डॉ. अजित पवार, डॉ. मिलिंद पटवर्धन, डॉ. प्रवीण शेवाळे, डॉ. शिरीष शेणई, डॉ. अर्जुन राठोडकर, डॉ. अनिशा वैद्य, डॉ. अश्विन वैद्य यांचंही सन्मान करण्यात आला.
यावेळी आयएमए चे उपाध्यक्ष डॉ.अतुल ढगे, सचिव डॉ. प्रज्ञा पोतदार, खजिनदार डॉ. अजिंक्य गांगण यासह सर्व डॉक्टर सदस्य उपस्थित होते.