
“स्वरूप परिवार” सन्मानाने स्वरूपानंद ठेवीदारांना सन्मानित करणार – ॲड.दीपक पटवर्धन
रत्नागिरी :स्वरूपानंद सहकारी पतसंस्था गेली ३२ वर्ष अर्थकारण करत आहे. सातत्यापूर्ण अर्थकारण करतानाच ४२ हजार ग्राहक सभासद संस्थेच्या दप्तरी नोंद आहेत. सभासदांची वाढती संख्या संस्थेचा पाया अधिक भक्कम व विस्तृत करत आहे.
ठेवीदारांनी पतसंस्थेच्या ठेव योजनांना नेहमीच भरभरून प्रतिसाद दिला आहे. अनेक ठिकाणी कुटुबाचे सर्व सदस्य पतसंस्थेचे गुंतवणूकदार आहेत. स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे एका कुटुंबातील सर्व सदस्य जर पतसंस्थेच्या ठेवीदार असतील आणि त्यांच्या ठेवी सातत्यापूर्ण असतील अशा ठेवीदारांना “स्वरूप परिवार” असा सन्मान देऊन गौरवांकित करणार आहे.
३२ वर्षात तिसऱ्या पिढीतील सदस्य पतसंस्थेचे ठेवीदार झाले आहेत ही गोष्ट औचित्यपूर्ण आहे. संपूर्ण परिवाराची पतसंस्था म्हणून स्वरुपानंदला मिळणारी पसंती, निर्माण झालेली ही विश्वासार्ह प्रतिमा अधिक वृद्धिगत करत नेण्यासाठी पुढच्या पिढीतील सदस्य पतसंस्थेशी निगडित होणे खूप महत्त्वपूर्ण ठरते. जुन्या परंपरा नवीन पिढीकडे वर्ग व्हाव्यात, जुन्या पिढीचे सहकार्य, निर्माण झालेले ऋणानुबंध जपत नव्या पिढीलाही सहकारी संस्थेच्या कार्याची माहिती व्हावी, नवी पिढी पतसंस्थेशी संलग्न व्हावी आणि नव्या जुन्याचा मिलाफ होऊन पतसंस्थेचा ग्राहकवर्ग सदैव बहरता रहावा म्हणून ठेव वृद्धीमासाच औचित्य साधत ठेवीदार परिवारांना गौरवांकित करण्याचा उपक्रम पुढील सप्ताहात करणार असल्याची माहिती ॲड.दीपक पटवर्धन यांनी दिली.
दि. २० जून ते २० जुलै या ठेववृद्धी मासात आकर्षक व्याजदराच्या सुरक्षित ठेव योजनांमध्ये मोठी गुंतवणूक करावी असे आवाहन ॲड.दीपक पटवर्धन यांनी केले.
दि.२० जून ते १ जुलै या ११ दिवसात पतसंस्थेकडे ३५० ठेव खात्यात रु. ५ कोटी ५५ लाख इतकी भरगोस ठेव जमा झाल्याची माहिती ॲड.दीपक पटवर्धन यांनी दिली.