
भाटीमिऱ्या येथे हातभट्टीच्या दारू विक्रीवर कारवाई
रत्नागिरी: शहराजवळील भाटीमिया येथे घराच्या बाजूला प्लास्टिकच्या शेडमध्ये विनापरवाना हातभट्टीच्या दारू विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी २ हजार ३३५ रुपयांची ४० लिटर दारू जप्त केली. शहर पोलिसात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अमित अनिल मयेकर असे संशयिताचे नाव आहे. ही घटना ३० जून ला सायंकाळी पाचच्या सुमारास भाटीमिऱ्या येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाटीमिया येथे गावठी हातभट्टीची दारू विक्री होत असल्याची गोपनिय माहिती मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी कारवाई केली असता संशयिताकडे २ हजार ३३५ रुपयांची ४० लिटर अवैद्य गावठी दारू सापडली.