
गणेशोत्सवात चिपळूणसाठी स्वतंत्र मेमू स्पेशल गाडी
रत्नागिरी:- दिवा ते चिपळूण मार्गावर दिनांक 13 सप्टेंबर पासून 3 ऑक्टोबर 2023 पर्यंत मेमू स्पेशल गाडी चालवण्यात येणार आहे. पूर्णपणे अनारक्षित असलेल्या या गाडीमुळे मुंबईहून गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिनांक 13 सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर 2023 या कालावधीत युवा चिपळूण मेमो स्पेशल गाडीच्या एकूण 36 फेऱ्या होणार आहेत.
दिवा ते चिपळूण मेमू स्पेशल 01155/01156 गाडी दिवा येथून सात वाजून 45 मिनिटांनी सुटून चिपळूणला ती एक वाजून 25 मिनिटांनी पोहोचणार आहे. चिपळूणला आलेली मेमू स्पेशल गाडी दुसऱ्या दिवशी दिनांक 14 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2023 या कालावधीत दुपारी १ वाजता सुटून रात्री सात वाजता ती दिवा जंक्शनला पोहोचेल.
दिवा चिपळूण मेमू स्पेशल गाडीचे थांबे पनवेल, पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव, वीर, सापेवामने, करंजाळी वामने, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी, खेड तसेच अंजनी.
दिवा ते चिपळूण ही आठ डब्यांची गाडी असेल. पूर्णपणे अनारक्षित असलेल्या या गाडीमुळे नियमित तसेच विशेष गाड्यांचे कन्फर्म आरक्षण न मिळाला प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. याआधी कोकण रेल्वे तसेच मध्य रेल्वेने रत्नागिरी पर्यंत धावणारी मेमू स्पेशल गाडी देखील जाहीर केली आहे.