ठेव वृद्धीमासात २७५ कोटींचा ठेव टप्पा पूर्ण करणार ;
पहिल्या १० दिवसात ५ कोटींच्या नव्या ठेवी – ॲड.दीपक पटवर्धन
रत्नागिरी :२० जून ते २० जुलै या ठेव वृद्धीमासात स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला गुंतवणूकदारांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या १० दिवसात ५ कोटी ७ लाख इतक्या नव्या ठेवी पतसंस्थेकडे जमा झाल्या आहेत.
दि.२० जून ते २० जुलै हा स्वरूपानंद पतसंस्थेचा ठेव वृद्धीमास उत्सवी स्वरूपात साजरा केला जात आहे. स्वरूपानंद पतसंस्थेशी जोडलेले ठेवीदार ठेव योजनांमध्ये भरभरून गुंतवणूक करत आहेत. पहिल्या १० दिवसात ५ कोटी ७ लाखांच्या ठेवी ठेवीदारांनी गुंतवल्या असून नव्याने अगर पहिल्या वेळीच गुंतवणूक करणाऱ्या ठेवीदारांची संख्या ही सर्वच ब्रँचमध्ये वाढत आहे. ही गोष्ट लक्षणीय आहे. पारंपारिक ठेवीदार महिला ठेवीदार याचबरोबर नव्या पिढीतले ठेवीदार असा सुंदर मिलाफ या ठेव वृद्धी मासात आत्तापर्यंत अनुभवास आला अशी माहिती ॲड.दीपक पटवर्धन यांनी दिली.
३० जून अखेर संस्थेच्या एकूण ठेवी रु.२७० कोटी ३१ लाख झाल्या असून हा ठेव वृद्धीमास संपण्यापूर्वी ठेवींनी २७५ कोटींची वेस ओलांडलेली असेल.
वाढत्या गुंतवणुकीमुळे कर्जाची वाढती मागणी पूर्ण करणे सहज शक्य होत आहे. संस्थेचा C.D रेशो ६०% झाला आहे ही लक्षणीय गोष्ट आहे.
ठेव वृद्धीमासात स्वरुपांजली ठेव योजना ८.००%(सर्वसाधारण) ८.२५% (ज्येष्ठ नागरिक/महिला) (१२ ते १८ महिने), सोहम ठेव योजना ८.२५%(सर्वसाधारण) ८.५०% (ज्येष्ठ नागरिक/महिला) (मासिकव्याज) (१९ ते ३६ महिने) या योजना ठेवीदारांसाठी घोषित केल्या आहेत. त्यामध्ये गुंतवणूक करावी असे आवाहन ॲड.दीपक पटवर्धन यांनी केले आहे.