
नवनिर्वाचित अध्यक्ष नागेश बेर्डे यांची संपर्क युनिक फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट
रत्नागिरी :जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरीचे सल्लागार नागेशजी बेर्डे यांची संपर्क युनिक फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. त्यांची नुकतीच रत्नागिरी जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली. याबद्दल एनजीओचे अध्यक्ष शकील गवाणकर, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष निलेश नार्वेकर, रत्नागिरी तालुका अध्यक्ष जमीर खलफे यांनी संस्थेच्यावतीने त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.