
राजापुरातील प्रौढाचा संशयास्पद मृत्यू; २१ दिवसांनी सापडला मृतदेह
राजापूर :मित्राकडे जातो असे सांगून ५ जूनला घरातून बाहेर पडलेल्या सुनील दामोदर फोडकर (५४, कशेळी, ता. राजापूर) यांचा मृतदेह तब्बल २१ दिवसांनी जवळच्या गावातील जंगलात आढळला आहे.
सुनील फोडकर यांना मद्याचे व्यसन होते. ५ जून रोजी सकाळी ६.३० वाजता ते घरातून बाहेर पडले. मात्र घरी परत आले नाहीत. त्यांचा सगळीकडे शोध घेतला जात होता. दि. २६ रोजी जवळच्याच लोणवी गावातील काहीजण काजू बिया आणण्यासाठी जंगलात गेलेत् असताना तेथे त्यांना मानवी हाडे दिसली. तेथील कपड्यावरुन ते सुनील फोडकर असल्याचे निश्चित झाले आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.