
एसटी स्टँड समोर उभी दुचाकी लांबवली
रत्नागिरी :शहरातील एसटी स्टँडसमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञाताने लांबवली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी २२ जुन रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याबाबत फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी गुरुवारी दुपारी एसटी स्टँड समोरील सोलकर सायबर कॅफेजवळ त्यांचा भाऊ अमान याने आपली दुचाकी (एमएच ०८ एएम-४२८३) पार्क केली होती. काही वेळाने तो दुचाकी पार्क केलेल्या टिकाणी आला असता, त्याला आपली दुचाकी दिसून आली नाही. त्याने आजूबाजूला दुचाकीचा शोध घेतला; परंतु ती मिळून न आल्याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.