
३२ वर्षात तिसऱ्या पिढीकडे स्वरूपानंद पतसंस्थेवरचा विश्वास संक्रमित करण्यात मिळालेल यश खूप बोलके – ॲड.दीपक पटवर्धन
रत्नागिरी :गेली ३२ वर्ष स्वामी स्वरूपानंद पतसंस्था संस्थेची प्रगती गाथा, नवनवीन उच्चांकी आकडेवारी, कार्यविस्तार आणि २० जून ते २० जुलै हा प्रतिवर्षी होणारा ठेवोत्सव यामुळे स्वरूपानंद पतसंस्था जनमानसात सातत्याने विराजमान राहिली.
कार्यकक्षा विस्तरल्या
तालुका कार्यक्षेत्र ते जिल्हा ते विभाग, विभाग ते राज्य कार्यक्षेत्र हा ही विषय पतसंस्थेच्या यशशृंखलेची मजबूत पकड अधोरेखित करतो. १ छोट कार्यालय ते विस्तृत प्रदेशात पसरलेल्या १७ शाखा ही बाब स्वरूपानंदच्या यशाची चढती कमान दर्शक आहे.
10 हजार ते 400कोटींचा पल्ला
स्वरूपानंद पतसंस्था स्थापन झाली त्यावेळी ३०० सभासद व १० हजारांचे भांडवल इतका अल्प असा आर्थिक आधार होता. आज ४३ हजार सभासद आणि ४०० कोटींचे संमिश्र असलेले खेळते भांडवल इतका विस्तृत आर्थिक आधार स्वरूपानंदने निर्माण केला.
चढत्या क्रमांकाने सातत्यपूर्ण अर्थकारण
२६६ कोटींच्या ठेवी, १८९ कोटींची कर्जे, ३७ कोटींचा स्वनिधी, ९९.६०% वसुली, १३३ कोटींच्या बँक गुंतवणूका अशी भक्कम स्थिती राखत भांडवल पर्यात्पता प्रमाण २७% तसेच शुन्य % N.P.A व ६०% C.D रेशो अशी विक्रमी प्रमाणे राखणाऱ्या पतसंस्थेचे आर्थिक भक्कम आधारच रहस्य ग्राहकांशी निर्माण केलेला ऋणानुबंध.
कौटुंबिक परंपरा प्रवाही राहिली
३१ वर्षापूर्वी ५० ते ६० वर्षाची असणारी पिढी ठेवीदार म्हणून स्वरूपानंदच्या संपर्कात आली. कालामानानुसार दुसरी पिढी ही स्वरूपानंदचे ग्राहक म्हणून कायम राहिली आणि आता ३० वर्षानंतर डिजिटल युगातील युवा पिढी पूर्व संस्कार, परंपरा मनात रुजवून स्वरूपानंद पतसंस्थेशी सलंग्न झाली आहे. जो विश्वास ३१ वर्षापूर्वी स्वरूपानंदने जागवला तो दृढ होत ३१ व्या वर्षी तिसऱ्या पिढीकडे संक्रमित झाला. ठेव वृद्धीमासातील ठेवीदारांची नावे पाहिली आणि बॅक हिस्ट्री तपासली की स्वरूपानंद पतसंस्था ही कुटुंबाची पारंपारिक गुंतवणूक ठेवणारी अर्थसंस्था आहे याची प्रचिती येते.
ठेव वृद्धीमासात गुंतवणूक ही कौटुंबिक परंपरा म्हणून जपणारे परिवार
स्वरूपानंदच्या ठेव वृद्धीमासात आपली ठेव गुंतवण्याचा २५ वर्षांपूर्वी सुरू झालेला परिपाठ अजूनही अविरतपणे सुरू आहे.
स्वरूपानंदच्या ठेववृद्धीमासात तिसऱ्या दिवशी पतसंस्थेने २ कोटी १०लाखांच्या नवीन ठेवी संकलित केल्या याचे कारण नवीन ठेवीदार आणि पिढीज्यात ठेवीदार यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. ग्राहक सभासदांना आपुलकी, प्रेम वाटाव, आपलेपणा वाटावा यासाठी डोळसपणे आणि अंतर्यामी प्रेरणेने राबवलेले धोरण खूप यशस्वी झालय ते यश स्वरूपानंदच्या सातत्यपूर्ण अर्थकारणातून प्रतित होतय.
ठेववृद्धी मासात मोठ्या प्रमाणावर ठेव संकलन होतय हा विश्वास सदैव जपत पुढे जात प्रत्येक टप्यावर संस्थेशी जोडल्या जाणाऱ्या ग्राहक सभासदास आपलस करत, विश्वास जिंकत मार्गक्रमण करताना होणारा आनंद, समाधान लाख मोलाचे आहे.
सुरु असलेल्या ठेववृद्धी मासात मोठी गुंतवणूक स्वरूपानंदकडे पहायला मिळेल असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला.