
एज्यूकेशन सोसायटीने कडवई वृक्ष वाटपाची प्रथा ठेवली अबाधित.
रत्नागिरी :एज्युकेशन सोसायटी कडवई रत्नागिरीच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये एक महत्वाचे नव अध्यय आधुनिक शिक्षणाबरोबर विद्यार्थ्याच्या सर्वांगिन विकासावर संस्थेचे विशेष लक्ष आहे. गेल्यावर्षी पासून संस्थेणे नवीन उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाचे नाव आहे. ESK ONE STUDENT ONE TREE या अंतर्गत संस्थेमध्ये शिकणाऱ्य प्रत्येक मुलाला एक झाड सुरक्षा नेट व संस्थेकडून देण्यात येते व शिक्षकांच्या माध्यमातून प्रत्येक झाडाची अपडेट संस्था आपल्या कडे घेत असते. या वरुन काही करणास्थव जर झाडे खराब झाली किंवा मृत पावली तर संस्था त्वरित दुसरे झाड विद्यार्थ्याना देते.या पद्धतीने दि.कडवई इंग्लिश स्कूल,महाराष्ट्र उर्दू हायस्कूल व कालसेकर ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स कडवई या विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याला साग,आंबा,काजू,कोकम,आवळा,पेरू, आदि उपयोगी वनस्पति संस्थेने देऊ केल्या आहेत. या वर्षी शैक्षणिक वर्ष 2023-24 सुरू होणाऱ्या औचिल्याने संस्थेमध्ये दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्याना देखील रोप वाटप करण्यात आले.या प्रसंगी संस्था अध्यक्ष सादीक काझी,लोकल कमिटी अध्यक्ष सिकंदर जुवळे उर्दू हायस्कूल मुख्याध्यापक कारागीर सर उपस्थित होते.