
गावठी दारु विक्रीसाठी बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल
रत्नागिरी:- शहरानजीकच्या नाचणे येथे बेकायदेशिरपणे गावठी दारु विक्रीसाठी बाळगणार्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई शनिवार 17 जून रोजी सायंकाळी 5.50 वा.करण्यात आली.
संदिप शंकर रणसे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.शनिवारी सायंकाळी शहर पोलिस शहरानजीकच्या नाचणे परिसरात गस्त घालत होते.त्यावेळी आदिनाथ नगर सोसायटी समोरील झोपडपटटी मागील जंगलमय भागात संशयित हा गावठी हातभटटीची दारु विक्रीसाठी आपल्याजवळ बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली.त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारु अधिनियम कायदा 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.