
जाळ्यात अडकलेल्या समुद्री कासवाला
कोकण रेल्वेच्या टिसीकडून जीवदान
रत्नागिरी :भाट्ये किनारी मासेमारीच्या जाळ्यात अडकून जखमी झालेल्या कासवाला कोकण रेल्वेचे तिकीट तपासनिस आणि प्राणीमित्र विवेक नलावडे यांनी जाळ्यातून सुटका करीत पुन्हा समुद्राच्या पाण्यात सोडून देऊन जीवदान दिले.
कोकण रेल्वेमध्ये तिकीट तपासनिस या पदावर कार्यरत असेलेल विवेक नलावडे हे शुक्रवारी संध्याकाळी आफ्ल्या कुटुंबासमवेत भाट्ये येथे फिरायला गेले होते. त्यांना झरी विनायककडे जाण्यार्या सागरी किनार्यानजीक जाळ्यात काहीतरी हालताना दिसे म्ङणुन त्यांनी चिकित्सक पणे पाहयला गेले असता त्यांना जाळ्यात अडकलेले समुद्री कासव निदर्शनास आले.