भाजपतर्फे आज रत्नागिरीत बाईक रॅलीचे आयोजन
रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या उज्वल आणि सेवाभावी कार्य कर्तृत्वाला ९ वर्ष पूर्ण झाली आहेत. भारतीय जनता पार्टीतर्फे विकासतीर्थ (बाईक) रॅलीचे नियोजन करण्यात आले आहे. बाईक रॅली ही आज शनिवार दिनांक १७ रोजी संध्याकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, मारुती मंदिर सर्कल येथून सुरवात होणार आहे.
भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे बाईक रॅलीची सांगता होणार आहे. भाजपच्या सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते महिला मोर्चा, युवा मोर्चा यांनी बाईक रॅलीमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन शहराध्यक्ष सचिन करमरकर, सरचिटणीस संदिप सुर्वे, राजन पटवर्धन, युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्रम जैन, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, सरचिटणीस उमेश कुळकर्णी व ओंकार फडके यांनी केले आहे.