
करजुवे डावलवाडी, भाटलेवाडी येथे सिद्धेश ब्रीद यांनी स्वखर्चातून मारली बोरवेल
संगमेश्वर:तालुक्यातील तांबेडी गावचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश ब्रीद यांच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा स्वखर्चातुन विकास कामांचा धमाका सुरूच असुन करजूवे डावलवाडी आणि भाटलेवाडी येथे सिद्धेश ब्रीद यांच्या माध्यमातून बोरवेल मारण्यात आली असून तेथील ग्रामस्थांचा पाणी प्रश्न सिद्धेश ब्रीद यांनी मार्गी लावला आहे.
करजुवे येथील डावलवाडी आणि भाटलेवाडी येथे मोठी पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती.त्यांनी अनेक पुढऱ्यांना वाडीतील लोकांना पाणी देण्यासाठी विनवणी केली मात्र कोणीच पाणी पाजले नाही.वाडीतील काही लोकांनी सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश ब्रीद यांना संपर्क केला आणि आपली समस्या मांडली यावेळी सामाजिक कार्याचा वसा घेतलेला असल्याने ब्रीद यांनी ग्रामस्थांना शब्द दिला.फक्त तेवढ्यावरच न थांबता तात्काळ ग्रामस्थांची मागणी पूर्ण करत त्यांचा पाण्याच्या प्रश्न मार्गी लावला.सिद्धेश ब्रीद यांनी केलेल्या कार्याबद्दल ग्रामस्थांनी गौरव उदगार काढले आणि म्हणाले आम्हाला सिद्धेश ब्रीद यांच्या रूपात देवदूत मिळाला आहे.
सिद्धेश ब्रीद यांनी परिसरातील तसेच तालुक्यातील अनेक लोकांची कामे केली आहेत.त्यामध्ये वैयक्तिक स्वरूपाची आणि सामूहिक स्वरूपातील कामे केली असुन ज्यांचे वजन तालुक्यात कमी होत आहेत अश्या लोकांकडून सामाजिक कार्याला राजकीय डाग लावला जात आहे.परिसरात तसेच तालुक्यात राजकीय कारकीर्त संपुष्टात येण्याच्या मार्गांवर असल्याने एका राजकीय मोठ्या दरबारात हे उपद्व्याप सूरू आहेत.अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.