
शहरातील हयातनगर येथून विवाहिता बेपत्ता
रत्नागिरी :शहरातील हयातनगर येथून विवाहिता बेपत्ता झाल्याबाबत शहर पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली आहे.ही घटना गुरुवार 8 जून रोजी रात्री 9 वा.घडली आहे.
हिना मुबिन जुवळे (42,रा.हयातनगर,रत्नागिरी) असे बेपत्ता झालेल्या विवाहितेचे नाव आहे.याबाबत तिचा पती मुबिन इनयात जुवळे (45,रा.हयातनगर,रत्नागिरी) याने शुक्रवार 9 जून रोजी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली.त्यानूसार,गुरुवार 8 जून रोजी रात्री त्याची पत्नी हिना ही घरात कोणाला ही न सांगता निघून गेली आहे.आजुबाजुच्या परिसरात तसेच इतर नातेवाईकांकडे हिना शोध घेण्यात आला परंतू ती कोठेही मिळून न आल्याने याबाबत शहर पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली आहे.याप्रकरणी अधिक तपास पोलिस हवालदार आर.आर.जाधव करत आहेत.