
खेडमध्ये घरावर झाड कोसळून लाखोंचे नुकसान
खेड : तालुक्यातील माणी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ असलेला जुनाट पिंपळाचे झाड वादळी वाऱ्याने सुरज भिमराव मोरे यांच्या घरावर कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले.
तालुक्यातील माणी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ 100 वर्षे जुने पिंपळाचे झाड धोकादायक झाले होते. हे झाड तोडून घरावर पडणार नाही, ही दक्षता घेण्याची मागणी सुरज मोरे यांनी 7 सप्टेंबर 2022 रोजी ग्रामपंचायतीकडे केली होती. मात्र ग्रामपचायतीने याकडे लक्ष न दिल्याने मोठा फटका मोरे यांना बसला आहे. नुकत्याच झालेल्या वादळात घरावर झाड कोसळल्याने लाखोंची हानी झाली. तलाठी यांनी घराच्या नुकसानीचा तातडीने पंचनामा करून त्या अहवाल तहसीलदार यांना सादर करावा व शासकीय नुकसान भरपाई देण्याची मागणी मोरे यांनी केली आहे.