
अज्ञात वाहनाच्या धडकेत प्रौढाचा मृत्यू
संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील घाटीवळे फाटा कदमवाडी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत 53 वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकावर देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास गोविंद जाधव असे अपघातात ठार झालेल्या प्रौढाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विलास जाधव हे आपल्या ताब्यातील ज्युपीटर मोटार सायकल घेवून घाटीवळे फाटा कदमवाडी येथून घाटीवळे बौध्दवाडीकडे जात होते. रस्ता ओलांडताना कोल्हापुर दिशेकडून येणाऱ्या अज्ञात वाहनाने ज्युपिटरला धडक दिल्याने अपघात घडला. अपघातानंतर अज्ञात वाहन चालकाने पलायन केले. विलास जाधव यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यु झाला.