
रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंत यांनी केले विविध विकास कामांचे भुमिपूजन
रत्नागिरी : उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी आज नगरपरिषद हद्दीतील राजिवडा येथे विविध विकास कामांचे भुमिपुजन केले. यावेळी त्यांच्यासमवेत प्रशासक तथा रत्नागिरीचे मुख्याधिकारी तुषार बाबर, माजी नगरसेवक सोहेल मुकादम उपस्थित होते. नगरपरिषद निधी अंतर्गत रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील राजिवडा बांध ते राजिवडा पिंपळपार चौकादरम्यान अस्तित्वातील जीर्ण रस्ता नव्याने काँक्रीटीकरण करणे, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) अंतर्गत रत्नागिरी नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 7 मधील राजिवडा येथील पावसकर बाग ते श्री. सोलकर यांच्या घरादरम्यान अस्तित्वातील जीर्ण गटर नव्याने बांधकाम करणे, रत्नागिरी नगर परिषद हद्दतील प्रभाग क्रमांक 7 मधील राजिवडा येथील श्री. सोलकर यांच्या घरापासून ते श्री. खान यांच्या घरादरम्यान आर. सी. सी. गटर बांधणे, रत्नागिरी नगर परिषद हद्दतील प्रभाग क्रमांक 7 मधील राजिवडा येथील श्री. खान यांच्या घरापासून ते राजिवडा नाल्यादरम्यान आर.सी.सी. गटर बांधणे या विकास कामांचे भुमिपूजन पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी केले. याप्रसंगी प्रभाग क्रमांक 7 मधील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
