
दुचाकीस धडक देवून अपघात केल्याप्रकरणी चालकावर गुन्हा
खेड:- तालुक्यातील घाणेखुंट येथे दुचाकीस्वाराने समोरील दुचाकीस धडक देवून अपघात केल्याप्रकरणी शहीनूर बबलूमियाँ हक (24) याच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहीनूर हक हा आपल्या ताब्यातील (एम.एच. 08/ए.जे. 3758) क्रमांकाच्या दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या (एम.एच.08/ एस. 2826) क्रमांकाच्या दुचाकीस्वारास समोरून धडक दिली. या अपघातात सदानंद मधुकर जोयशी (रा. लवेल) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. याशिवाय त्यांच्या दुचाकीचे नुकसान झाले. त्यानुसार हक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.