
शिक्षक अब्दुल रहमान कुरेशी याचा सत्कार
रत्नागिरी : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक उर्दू शाळा. कोतवडेचे शिक्षक अब्दुल रहमान शर्फुद्दिन कुरेशी हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर शाळा. पालक आणि ग्रामस्थांनी कुरेशी यांचा जोरदार सत्कार समारंभ केला.
शिक्षक कुरेशी यांनी आपल्या सेवेला खासगी शाळेपासून सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद रत्नागिरी नगर परिषद आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या विविध शाळेत काम करुन शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्याच्या दृष्टीने चोख कामगिरी बजावली. रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा अल्पसंख्यांक समन्वयक म्हणून उत्तम कामगिरी बजावत शासनाच्या अल्पसंख्यांक समाजासाठीच्या योजना जिल्ह्यातील तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवल्या. तसेच महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष पदही यांनी उत्तमरित्या भूषविले. विविध प्रकारच्या शैक्षणिक प्रशिक्षणामध्ये केंद्रस्तरीय ते राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शक म्हणूनही काम केले. त्यांनी ३५ वर्ष सेवा बजावली. तसेच त्यांच्या दोन्ही मुलांना नगर परिषद व जिल्हा परिषद शाळांमधून शिक्षक देवून डॉक्टर व इंजिनियर केले.

कुरेशी यांनी केलेल्या उत्तम कामगिरीची दखल घेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक उर्दू शाळेची पालक समिती, ग्रामस्थांनीही त्यांना भेटवस्तू, शाल, श्रीफळ देवून सन्मान केला.