
मराठी पत्रकार परिषदेतर्फे आज जिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिर
रत्नागिरी :रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील अत्यंत कमी असलेला रक्तसाठा आणि त्यामुळे विविध तालुक्यातून रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची परवड थांबवण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेने पुढाकार घेतला आहे. रक्ताची टंचाई दूर करण्यासाठी मराठी पत्रकार परिषद रत्नागिरी यांच्यावतीने शनिवार दि. १० जून रोजी सकाळी १०.३० वाजता शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा कार्यकारिणीच्यावतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयातील रक्ताची कमतरता दूर व्हावी आणि सर्वसामान्य रुग्णांची गैरसोय दूर व्हावी या हेतूने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार १० जून रोजी सकाळी साडेदहा वाजता या शिबिराचा शुभारंभ होईल. तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान शिबीराच्य ठिकाणी रक्तदान करणेसाठी उपस्थित रहावे. जिल्हातील सर्व पत्रकार बांधवांनी देखील या श्रेष्ठदानात आपला सहभाग नोंदवून हे शिबिर यशस्वी करावे, असे आवाहन रत्नागिरी मराठी पत्रकार परिषदे मार्फत करण्यात आले आहे.
.