
रत्नागिरी तालुका व शहर बुथ कमिट्या बनविण्याचा कांग्रेसचा निर्धार
रत्नागिरी :रत्नागिरी तालुका आणि शहर काँग्रेसची बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीत रत्नागिरी तालुका आणि शहरातील बूथ कमिट्या प्राधान्याने बनवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. तसेच येणाऱ्या निवडणुका एकमताने लढण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
रत्नागिरी तालुका आणि शहर काँग्रेसची बैठक शुक्रवारी काँग्रेस भुवन येथे पार पडली. बैठकीच्या सुरुवातीला शहराध्यक्ष रमेश शाहा व तालुकाध्यक्ष विकास पाटील यांनी आपल्या कामाचा आढावा सादर केला. यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी संघटना वाढीकरीता बूथ कमिट्या बनविण्याचे आवाहन केले. तसेच सर्वानी एकजुट होऊन पक्ष वाढीचे काम करावे असे सांगितले.
माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांनी कार्यकर्त्याना गटबाजी संपुष्टात आणण्याचे आवाहन केले. यापुढे पक्षाच्या झेंड्याखाली आणि पक्षाच्या अजेंड्यानुसार एकदिलाने प्रत्येकाने काम करण्याचे आवाहन श्री. रमेश किर यांनी यावेळी केले. तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यानी समन्वय साधून काम करू आणि पक्षाला बळकटी देऊ अशी सूचना देखील त्यांनी यावेळी केली.
या बैठकीला जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांच्यासह माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर, जिल्हा उपाध्यक्ष व रत्नागिरीचे प्रभारी हारिस शेकासन, महिला प्रदेश सरचिटणीस रुपाली सावंत, तालुकाध्यक्ष विकास पाटील, शहराध्यक्ष रमेश शाहा, माजी उपनगराध्यक्ष
बाळा मयेकर, राकेश चव्हाण, दिपक राउत, काका तोडणकर, बंडू सावंत, शराफत वागले, आतिफ साखरकर, रफिक मुल्लाजी, नाथा आढाव, कल्पेश जाधव, बरकत काझी, प्रितम पिलणकर, लक्षमीकांत मयेकर, शब्बीर भाटकर, पांडू शेठ कवितके उपस्थित होते.
सभेच्या शेवटी तालुकाध्यक्ष विकास पाटील, शहराध्यक्ष रमेश शाहा व जिल्हा उपाध्यक्ष व प्रभारी हारीस शेकासन यांनी रत्नागिरी तालुका व शहरातील सर्व बूथ कमिट्या लवकरात लवकर बनविण्याचा निर्धार व्यक्त केला.