
अज्ञात वाहनाच्या धडकेने भरणानाका येथे पादचाऱ्याचा मृत्यू
खेड :मुंबई गोवा महामार्गावर खेड भरणे नाका येथे नवभारत हायस्कुल समोर बुधवारी रात्री १० च्या सुमारास रस्ता ओलांडत असताना अन्यात वाहनाच्या धडकेने भरणे समर्थ नगर येथील गजानन सावंत हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी ठोकर देऊन अज्ञात वाहन चालक फरार झाला आहे.
अपघाताची खबर मिळताच खेड पोलिसानी घटनास्थळी धाव घेतली. अपघात झाल्यानंतर भरणे नाका येथील स्थानिक रहिवाशी अमित कदम, विनायक तोडणकर, संतोष नलावडे, करण पवार, अनिल पुजारी, अमोल जाधव, कल्पेश भोसले व सहकाऱ्यांनी मदतकार्य केले. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या गजानन सावंत यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. अपघाताची नोंद खेड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.